सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नाशिक, सातारा, धुळे, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या पिकाची लागवड केली जाते. कांद्याच्या लागवडीपासून ते साठवणीपर्यंत कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि किडी याचा प्रादुर्भाव होतो. कांद्याच्या पिकावर करपा रोग आणि फुलकिडी हा प्रामुख्याने पडणारा रोग आहे. या रोगामुळेच कांद्याच्या उत्पादनामध्ये घट होते. फुलकिडी हे कांद्याच्या फळावरील रस शोषून घेतात आणि यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होते.
advertisement
जर कांद्याच्या पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर वरटी सिरम त्याचबरोबर मेटेरायझमची फवारणी केली तरी चालेल. फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी लामोडासॉलिथीन प्रति 10 मिली 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी, तसेच बेल्टामिथीन 3 मिली 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी केल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच अधूनमधून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कांद्याच्या पिकामध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे लावणे गरजेचे आहे यामुळे फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कांद्यावर होण्यास कमी होईल.
कांद्याच्या पिकाला करपा रोगापासून बचाव करण्यासाठी ट्रायसाक्लॅझॉल 15 टक्के प्रति 10 मिली प्रति 10 लिटर किंवा टिबुकोण्याझोल 25.09 टक्के 10 मिली प्रति 10 लिटर पाणी 10 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करायची आहे. अशाप्रकारे कांद्यावर पडणाऱ्या करपा आणि फुलकिडी रोगावर एकात्मिक पद्धतीने कीड आणि रोग व्यवस्थापनातून कांदा पिकाचा बचाव केल्यास अधिकाधिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल, असा सल्ला मोहोळ येथील कृषी विज्ञान तज्ज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी दिला.





