Onion Crop : कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव? कोणकोणती करावी फवारणी? कृषी तज्ज्ञांनी दिली माहिती
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात कांद्याची लागवड केली जाते. परंतु सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर लागवडीपासून ते काढणीपर्यंत कांद्याची काळजी घ्यावी लागते.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात कांद्याची लागवड केली जाते. परंतु सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर लागवडीपासून ते काढणीपर्यंत कांद्याची काळजी घ्यावी लागते. कांद्यापिकावर पडणारे रोग कोणते? रोगापासून कांद्या पिकाचे कसे संरक्षण करावे? कोणकोणती फवारणी घ्यावी? या संदर्भात अधिक माहिती मोहोळ येथील कृषी विज्ञान तज्ज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नाशिक, सातारा, धुळे, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या पिकाची लागवड केली जाते. कांद्याच्या लागवडीपासून ते साठवणीपर्यंत कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि किडी याचा प्रादुर्भाव होतो. कांद्याच्या पिकावर करपा रोग आणि फुलकिडी हा प्रामुख्याने पडणारा रोग आहे. या रोगामुळेच कांद्याच्या उत्पादनामध्ये घट होते. फुलकिडी हे कांद्याच्या फळावरील रस शोषून घेतात आणि यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होते.
advertisement
जर कांद्याच्या पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर वरटी सिरम त्याचबरोबर मेटेरायझमची फवारणी केली तरी चालेल. फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी लामोडासॉलिथीन प्रति 10 मिली 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी, तसेच बेल्टामिथीन 3 मिली 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी केल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच अधूनमधून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कांद्याच्या पिकामध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे लावणे गरजेचे आहे यामुळे फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कांद्यावर होण्यास कमी होईल.
advertisement
कांद्याच्या पिकाला करपा रोगापासून बचाव करण्यासाठी ट्रायसाक्लॅझॉल 15 टक्के प्रति 10 मिली प्रति 10 लिटर किंवा टिबुकोण्याझोल 25.09 टक्के 10 मिली प्रति 10 लिटर पाणी 10 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करायची आहे. अशाप्रकारे कांद्यावर पडणाऱ्या करपा आणि फुलकिडी रोगावर एकात्मिक पद्धतीने कीड आणि रोग व्यवस्थापनातून कांदा पिकाचा बचाव केल्यास अधिकाधिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल, असा सल्ला मोहोळ येथील कृषी विज्ञान तज्ज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी दिला.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 22, 2025 3:22 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Onion Crop : कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव? कोणकोणती करावी फवारणी? कृषी तज्ज्ञांनी दिली माहिती

