TRENDING:

Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोर्टातून मोठी अपडेट, पसार कृष्णा आंधळे...

Last Updated:

देशमुख कुटुंबावर सुरुवातीपासूनच शासकीय अधिकारी, राजकीय व्यक्तींनी आरोपींना मदत केली, दबाव टाकला, तसेच त्यांना विविध प्रकरणांत गोवण्याचाही प्रयत्न झाला, असे धनंजय देशमुख म्हणाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणीला धनंजय देशमुख हे उपस्थित होते. यावेळी एक वर्षभरामध्ये या प्रकरणासंदर्भात कुटुंबाला, फिर्यादीला, साक्षीदारांना गावातील मंडळींना, सहकार्य करणारे लोक आहेत त्यांना राजकीय व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने दबाव आणण्याचा आणि गोवण्याचा प्रयत्न केला, असा खळबळ जनक दावा मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. तसेच या संदर्भातील संपूर्ण माहिती आम्ही तयार करून ठेवले आहे असेही धनंजय देशमुख म्हणाले.
News18
News18
advertisement

बीड न्यायालयात आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला यात तपासातील विलंब, फरार आरोपी आणि राजकीय दबावाबाबत गंभीर आरोप केले. न्यायालयाने फरार आरोपीबाबत माहिती देण्याचे निर्देश दिल्याचे सांगत त्यांनी तपास अधिकाऱ्यांना लवकरात-लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 12 डिसेंबरला चार्ज फ्रेमची तारीख असून एक वर्षानंतरही एक आरोपी फरार असणं हे दुर्दैव असा आरोप धनंजय देशमुखांनी केला. 29 नोव्हेंबरला प्रथम पुण्यस्मरण असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

advertisement

देशमुख कुटुंबावर सुरुवातीपासूनच शासकीय अधिकारी, राजकीय व्यक्तींनी आरोपींना मदत केली, दबाव टाकला, तसेच त्यांना विविध प्रकरणांत गोवण्याचाही प्रयत्न झाला. त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की , आम्हाला फक्त न्यायच हवा, आरोपींना फाशीची शिक्षा हीच आमची मागणी आहे.

आरोपींना फाशीची शिक्षा द्या : धनंजय देशमुख

न्यायालयाने फरार असलेल्या आरोपीबाबतची माहिती देण्याचे निर्देश दिले आहे. आमची तपास यंत्रणेला विनंती आहे लवकरात-लवकर त्याला जेरबंद करावं. पुढच्या 12 तारखेला चार्ज फ्रेमसाठी तारीख आहे. एक वर्षानंतर चार्ज फ्रेम होतोय एक आरोपी फरार आहे हे दुर्दैव आहे. लवकरात लवकर प्रकरण संपावं यासाठी मार्गदर्शक तत्व आहेत त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे.

advertisement

लवकरात लवकर निकाल लागावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हिच आमची मागणी आहे, असे धनजंय देशमुख म्हणाले.

अनेक प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न  : धनंजय देशमुख

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने आरोपींना मदत केली आहे किंवा कुठल्या राजकीय व्यक्तीने दबाव आणला. आम्हाला अनेक प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला पण आमच्या भावाची पुण्याई आहे. अजूनपर्यंत आम्ही कुठेच गुंतलो नाहीत आणि गुंतणारही नाहीत. आम्हाला फक्त न्याय पाहिजे न्यायाव्यतिरिक्त आम्हाला काहीच नाही पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोर्टातून मोठी अपडेट, पसार कृष्णा आंधळे...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल