TRENDING:

Satara Doctor Death Case : महिला डाॅक्टर प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर कनेक्शन? विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली

Last Updated:

भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं. यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणात एका खासदाराचंही नाव समोर आलं आहे. या मुद्द्यावरुन राजकारण तापल्याचं पाहायल मिळाले. मयत डॉक्टरच्या कुटुंबीयांसह विरोधकांनी थेटपणे यात भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं. यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळाले आहे.
News18
News18
advertisement

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. यात आत्महत्येनं आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं दिसतंय. हातावर आरोपींची नावे लिहित गळफास घेणाऱ्या महिला डॉक्टरनं अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून स्वत:चं आयुष्य संपवलं. यात एका खासदाराचा उल्लेख असल्यानं राजकारण तापलंय. पीएच्या मोबाईलवरुन खासदारानं संपर्क साधत आरोपींचे रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचं मृत महिला डॉक्टरनं सांगितलंय.. याच मुद्द्यावरुन आता विरोधकांनी भाजपचे माजी खासदार रणजीतसिंग नाईक निंबाळकरांवर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय..

advertisement

निंबळकरांनी आरोप फेटाळले

मयत महिला डॉक्टरच्या पत्रांमधून माजी खासदारांचा उल्लेख झालाय आणि आता विरोधकांनीही आरोपांची झोड उठवलीय पण, निंबळकरांनी मात्र हे आरोप फेटाळले आहे.. डॉक्टरच्या आत्महत्येशी आपला काहीच संबंध नसल्याचं सांगत, विरोधक आत्महत्येचंही राजकारण करत असल्याचा पलटवार निंबाळकरांनी केलाय. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही याप्रकरणात दोषी असणाऱ्यांना सोडणार नसल्याचं वक्तव्य केलंय.

advertisement

डॉक्टरच्या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित झाले आहे. डॉक्टरनं केलेला दावा जर खरा असेल, तर रणजीतसिंग नेमके कोणत्या प्रकरणात डॉक्टरवर दबाव टाकत होते? पोलीस आणि आरोग्य यंत्रणेनं मयत डॉक्टरच्या तक्रारींची दखल का घेतली नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं कोडं सुटण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे.. त्यामुळं आता महिला डॉक्टरचा बळी गेल्यानंतर तरी पोलीस आणि प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देतील, ही अपेक्षा.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara Doctor Death Case : महिला डाॅक्टर प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर कनेक्शन? विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल