दरम्यान आता आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांनी म्हटले आहे की, मी मुलीला ज्या वेळी भेटायला गेलो त्यावेळी माझ्या अनोळखी असलेला धष्टपुष्ट माणूस मला भेटला. तुम्ही मॅडमच्या वडील का? काही लागलं तर मला सांगा, असे मला विचारले होते. तेवढ्यात माझ्या मुलीने बघितल. माझ्या हाताला धरून घेतलं बाजूला घेतलं आणि कोणाशीही असं बोलत जाऊ नका असं मुलीने सांगितलं होतं . त्यामुळे पीडितेच्या वडिलांना भेटणारा आणि काही लागलं तर सांगा म्हणणारा तो धष्टपुष्ट व्यक्ती कोण प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
मुलीच्या हॉस्पिटलमध्ये वडील भेटायले गेले त्यादिवशी काय घडलं?
मुलीचे वडील म्हणाले, मुलीला भेटायला गेलो त्यावेळी तिथे अनोळखी असलेला धष्टपुष्ट माणूस होता. सर तुम्ही मॅडमच्या वडील का? असे म्हणत काही लागलं तर मला सांगा.. माझ्या मनात काही नव्हतं तेवढ्यात माझ्या मुलीने बघितल. माझ्या हाताला धरून घेतलं बाजूला घेतलं..त्यावेळी माझ्या मुलीने मला सांगितलं होतं कोणालाही असं बोलत जाऊ नका..लोक माझ्यावर दबाव आणायला बघत आहे त्याच्यामुळे बोलत जाऊ नका त्यामुळे मी बोललो नाही.
आरोपींना फाशी द्या, मुलीच्या वडिलांची मागणी
आमची मागणी एकच आहे जे गुन्हेगार आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे दुसरं काही मागणी नाही माझ्या मुलीच्या बाबतीत घडला आहे.. इथून पुढे कुठलाही मुलीवर अत्याचार झाला नाही पाहिजे यासाठीच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. इथून पुढे असं दुष्कृत्य करणाऱ्यांना भीती वाटली पाहिजे त्यामुळे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
तरुणीने नेमकं काय म्हटलय?
पीएसआय बदने याने माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप या डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. तसेच तिने प्रशांत बनकर याच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत, प्रशांत बनकर आपला मानसिक आणि शारीरीक छळ करत होता असं या तरुणीने म्हटलं आहे.
हे ही वाचा:
