TRENDING:

'250 दिवस बोलता आलं नाही आणि आता...', डॉक्टर प्रकरणावरून सुरेश धसांनी धनंजय मुंडेंना सुनावलं; वाद चिघळला

Last Updated:

बीडच्या बदनामीवरून आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा आमने सामने आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड :  बीड जिल्हा अन् एका जातीला ज्या नेत्यांनी बदनाम केलं त्याचा परिणाम सातारा महिला डॉक्टरला देखील झाला आहे, असा आरोप माजी मंत्री धनजंय मुंडे यांनी केला. त्यानंतर आज भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाव घेऊन बोलावे मग आम्ही बदनामी होण्यासारखं जे काही बोललोय ते पुन्हा पुन्हा बोलू परत, असा इशाराच सुरेश धस यांनी दिला आहे
News18
News18
advertisement

सातारा जिल्ह्यातील फलटण  उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली असून, तिच्या नोटमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केला. तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनेही तिला मानसिक त्रास दिला. .या प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंते आणि आमदार सुरेश धस यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

advertisement

स्वत:ची प्रतिमा उजळून घेण्याचा प्रयत्न करू नका : सुरेश धस

सुरेश धस म्हणाले, तुमची बदनामी आणि डॉक्टर महिलेचं प्रकरण हे कृपया एकत्र करु नका... तुम्हाला 250 दिवस बोलता आलं नाही आणि आता त्यातून बाहेर निघाल्यानंतर कुठल्याही प्रकरणाला स्वत:शी जोडत आहे. त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. डॉक्टर प्रकरणाचे कोणीही राजकारण करू नये, यात तुमचे राजकारणचे जोडे घुसवून स्वत:ची प्रतिमा उजळून घेण्याचा प्रयत्न करू नये.

advertisement

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी जिल्ह्याला बदनाम केलं. त्यावेळेस बीड जिल्ह्यातील प्रत्येक जात, जमात, अठरा पगड जातीची पोरं बाहेर शिकायला आहेत. त्यांना याचा त्रास होईल, याचा कोणी केला नाही. आणि आज तोच प्रकार समोर आला. संपदा यांना या सगळ्याचा त्रास झाला. गोव सोडून कोसो किलोमीटरवर आपलं पोट भरणारे लोक किती हिणवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळंके यांच्यावर नाव न घेता टीका केली.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअर तरुणाने नोकरी सोडली, पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, आज आहे 45 कॅफेचा मालक
सर्व पहा

साताऱ्याच्या डॉक्टर महिलेच्या डायरीत 'राज की बात',फलटण पोलीसांच्या हाती मोठा पुरावा; खुलासा होणार

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'250 दिवस बोलता आलं नाही आणि आता...', डॉक्टर प्रकरणावरून सुरेश धसांनी धनंजय मुंडेंना सुनावलं; वाद चिघळला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल