सातारा : गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात येणारे मखर आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर थर्माकोलचा वापर करण्यात येत होता. मात्र, शासनाने थर्माकोलवर बंदी घातल्यानंतर मखर आणि सजावटीसाठी पर्यावरणस्नेही इतर साहित्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. इको फ्रेंडली मखर तयार करून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात देशभर केली जात आहे.
सरकारच्या जागृतपणामुळे पर्यावरणपूरक गणपती सजावट आता लोकप्रिय झाली आहे आणि या गणेशोत्सवात नवनवीन ट्रेंडमध्ये आकर्षक अशा गौरी गणपतीचे डेकोरेशन मखर बाजारात अगदी सहजच उपलब्ध होऊ लागले आहेत. असेच एक साताऱ्यातील विसावा नाका परिसरामध्ये 500 रुपयांपासून ते 22 हजारापर्यंत गणपती गौरी डेकोरेशनचे मकर उपलब्ध झाले आहे. श्री समर्थ इंटरप्राईजेस यांच्यातर्फे विसावा नाका येथे ठक्कर हॉलमध्ये इको फ्रेंडली भव्य गणपती डेकोरेशन एक्जीबिशन मध्ये मिळत आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील हा आहे खूपच हाय प्रोफाईल एरिया, जागेची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही..
यामध्ये गौमुख डेकोरेशन, नंदी सेट, उंदीर सेट, सिल्क सेट, कापडी सेट, निसर्ग देखावे, देवी देवतांचे आणि श्री स्वामी समर्थांचा देखील सेट तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक वेगवेगळे मोठमोठे सेट तयार करण्यात आले आहेत. हे सेट इको फ्रेंडली आहेत म्हणजेच याची रचना ही पुट्ट्यामध्ये त्याचबरोबर फ्रेममध्ये एक से बढकर एक सेट सातारकरांच्या साठी खास तयार करण्यात आले आहेत.
आतापर्यंत तब्बल दोन ते तीन लाखाचे बुकिंग श्री समर्थ इंटरप्राईजेस येथे झाले आहे. त्याचबरोबर आता काही दिवसांमध्येच 10 लाखाहून अधिकची उलाढाल याठिकाणी होईल, असे अनिल कांबळे यांनी सांगितले. ते इकोफ्रेंडली गणपतीचे मकर हे महाराष्ट्रभर होलसेल दरात ते विक्री करतात. कर्नाटक, गुजरात हे मखर विक्रीसाठी दिले जातात, असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
गेली 15 वर्षांपासून अथक परिश्रम करून त्यांनी आपली मखर तयार करण्याची कंपनी उभारली आहे. या कंपनीमध्ये तब्बल 30 महिला आणि 10 पुरुष काम करत आहेत. दरवर्षी लाखोंच्या पटीत इको फ्रेंडली मखर तयार करून त्याची विक्री महाराष्ट्र सह इतर राज्यांमध्येही होत असल्याचे त्यांनी सांगितले.