छत्रपती संभाजीनगर शहरातील हा आहे खूपच हाय प्रोफाईल एरिया, जागेची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही..

Last Updated:

शहरात येणाऱ्या लोकांची लोकसंख्याही वाढत चालली आहे. यामुळे या ठिकाणी असलेल्या घरांना ही मोठ्या प्रमाणात मागणी आहेच. पण घराच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. इस्टेट एजंट संदीप कुलकर्णी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

+
फाईल

फाईल फोटो

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर हे झपाट्याने वाढणारे शहर आहे. शहरामध्ये अनेक असे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग आहेत. यामुळे शहरात लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अशातच शहरातील घरांच्या किमतीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील सर्वात हायप्रोफाईल एरिया कोणता आहे, या ठिकाणी घरांच्या किमती काय आहेत, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा खास आढावा.
advertisement
इस्टेट एजंट संदीप कुलकर्णी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये झपाट्याने वाढदेखील होत आहे. शहरात येणाऱ्या लोकांची लोकसंख्याही वाढत चालली आहे. यामुळे या ठिकाणी असलेल्या घरांना ही मोठ्या प्रमाणात मागणी आहेच. पण घराच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी, ज्योतीनगर, श्रेया नगर, टिळक नगर, बन्सीलाल नगर, वेदांत नगर, सिडको, एन वन, टू, थ्री या ठिकाणी घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात आहेत. या एरियामध्ये सर्व मोठे मोठे बिझनेस मॅन आणि इतरही प्रतिष्ठित लोक या ठिकाणी राहतात त्यामुळे या भागाच्या घरांच्या किमती खूप आहेत. दिवसेंदिवस येथील घरांच्या किमतीमध्ये वाढ होत चालली आहे.
advertisement
बदलापूरमधील घटनेने महाराष्ट्र हादरला, पालकांच्या मनात वाढली भीती, पुण्यातील महिलांच्या प्रतिक्रिया, VIDEO
या भागामध्ये दहा ते बारा हजार रुपये एका स्क्वेअर फुटची किंमत आहे. म्हणजे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की या ठिकाणी घरांच्या किमती या कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट रो हाऊस किंवा स्वतःचा बंगलाही खरेदी करता येतो. पण यांच्या किमती खूप आहेत. पैठण रोड, कांचनवाडी याठिकाणी देखील घरांच्या किमतीला करोडोंच्या घरांमध्ये आहेत. येणाऱ्या भविष्यामध्येही या ठिकाणी घरांच्या किमतीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छत्रपती संभाजीनगर शहरातील हा आहे खूपच हाय प्रोफाईल एरिया, जागेची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement