लेझर लाईटमुळे डोळ्यांना धोका
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत लेझर लाईटच्या वापराबद्दल गंभीर चर्चा झाली. लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळाने लेझर लाईटचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
advertisement
डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळा
डीजेच्या आवाजाच्या मर्यादेवरही या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. कर्णकर्कश, भीतीदायक किंवा ज्येष्ठ नागरिक आणि रक्तदाब व हृदयविकाराच्या रुग्णांना त्रास होईल, असा आवाज आल्यास तो शांतता व न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन मानले जाईल आणि थेट कारवाई केली जाईल. डीजेच्या आवाजाची मर्यादा तपासण्यासाठीही यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे डीजे चालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके
रोडरोमिओंचा बंदोबस्त : विसर्जनानंतर रात्री मोठ्या प्रमाणात महिला गणपती पाहण्यासाठी बाहेर पडतात. त्यांची छेडछाड किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
शांततेत मिरवणूक : विसर्जन मिरवणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना आवाहन : प्रशासनाने गणेशोत्सवाचे चांगले नियोजन केले असून, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच, कोणत्याही चिथावणीखोर कृत्याला बळी न पडण्याचे आवाहनही केले आहे.
ध्वनी प्रदूषणाचे नियम
- संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी आवश्यक.
- सांस्कृतिक, धार्मिक उत्सवासाठी रात्री 10 ते 12 पर्यंत परवानगी दिली जाऊ शकते.
- ही परवानगी वर्षातून जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी असते.
- सार्वजनिक ठिकाणी आवाजाची मर्यादा 75 डेसिबलपेक्षा जास्त नसावी.
हे ही वाचा : प्रवास करताना काळजी घ्या! रक्षाबंधनाला भावा-बहिणींना पाऊस भिजवणार, विदर्भासह 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
हे ही वाचा : अलमट्टी धरण 98% भरले! कर्नाटकात नदीकाठी पूराचा धोका, 42500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
