अलमट्टी धरण 98% भरले! कर्नाटकात नदीकाठी पूराचा धोका, 42500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील पावसाने विश्रांती घेतली असली, तरी अलमट्टी धरणात पाण्याची आवक अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धरणाची एकूण क्षमता 123 टीएमसी असून, सध्या त्यात...
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस थांबला असला, तरी अलमट्टी धरणात पाण्याची आवक अजूनही मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. अलमट्टी धरणाची एकूण क्षमता 123 टीएमसी असून, शुक्रवारी धरणात 120.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे धरण जवळपास 98 टक्के भरले असून, कोणत्याही क्षणी 100 टक्के भरू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढल्यास चिंता
सध्या अलमट्टी धरणात पाण्याची आवक 45455 क्यूसेक इतकी आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली, तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे कठीण होऊ शकते. यामुळे अलमट्टी धरणाच्या खालील कर्नाटकातील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
पुराचा धोका टाळण्यासाठी विसर्ग सुरू
पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरण व्यवस्थापनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सध्या 42500 क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
advertisement
धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारी

हे ही वाचा : प्रवास करताना काळजी घ्या! रक्षाबंधनाला भावा-बहिणींना पाऊस भिजवणार, विदर्भासह 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2025 6:57 AM IST
मराठी बातम्या/सांगली/
अलमट्टी धरण 98% भरले! कर्नाटकात नदीकाठी पूराचा धोका, 42500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू


