TRENDING:

Loksabha : उदयनराजे ज्याला घाबरतात तोच उतरला निवडणुकीच्या मैदानात, साताऱ्यात खळबळ

Last Updated:

भाजपकडून साताऱ्यात उदयनराजे लोकसभेच्या मैदानात उतरतील. तर त्यांच्याविरोधात मविआचे शशिकांत शिंदे असणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात महायुतीकडून अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून साताऱ्यात उदयनराजे लोकसभेच्या मैदानात उतरतील. तर त्यांच्याविरोधात मविआचे शशिकांत शिंदे असणार आहेत. यातच बिगबॉस फेम अभिजीत बिचुकलेसुद्धा अर्ज दाखल करणार आहे. अभिजीत बिचुकले यांनी 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिलीय. बिचुकले म्हणाले की, उदयनराजेंना संधी मिळाली आता जनतेने यावेळी मला संधी द्यावी. उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी करावे.
News18
News18
advertisement

बिचुकले म्हणाले की, मतदार राजा जागृत आहे आणि येत्या 19 एप्रिल ला मी अर्ज भरणार आहे. भाजपमध्ये उमेदवारी मिळावी ही उदयन दादांची इच्छा होती ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी करावे आणि लोकांनी पण करावे.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या ही मागणी केली होती. यामुळे मी संपूर्ण बहुजन समाजाला सांगू इच्छितो तुमचं बहुमोल मत मला मिळाले तर समुद्रातील छत्रपतींचे स्मारक होण्याबाबत मी पाठपुरावा करणार. वैचारिक वारस म्हणून सर्व जनतेने माझ्या पाठीमागे येण्याचे धाडस केले पाहिजे असंही बिचुकलेंनी म्हटलं. उदयनराजे यांनी एकदा गंमतीने प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, "मी फक्त एकालाच घाबरतो, अभिजीत बिचुकलेला."

advertisement

बिचुकलेंनी म्हटलं की, शक्ती प्रदर्शन म्हणजे काय असतं? शक्ती ही युद्धात दाखवायची असते. दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही. शरद पवार आणि उदयनराजे हार्डवैर आहे. मी सगळ्यांमध्ये एकटा लढतोय यामुळे मला एकदा संधी द्या. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
खरेदीची ही संधी नका सोडू! चामड्याच्या वस्तू 30 रुपयांपासून! मुंबईत हे आहे ठिकाण
सर्व पहा

शिवेंद्रराजेंचे वडील अभयसिंग राजे भोसले यांच्यावरही त्याकाळात लोकसभेला शरद पवारांनी खर्च केला होता. त्याच्यापेक्षा जास्त उदयनराजेंवर केला होता यामध्ये मला बोलायचं नाही. उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांना त्यांची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मी माझी मते मांडत आलो. सध्या उदयनराजेंना पाडण्यासाठी जयंत पाटील शरद पवार प्रयत्न करत आहे यावेळी जनतेने मला संधी द्यावी असं देखील अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Loksabha : उदयनराजे ज्याला घाबरतात तोच उतरला निवडणुकीच्या मैदानात, साताऱ्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल