फॅशन आणि पारंपरिकतेचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्टॉलवर कोल्हापुरी चप्पल देखील उपलब्ध आहे. पुरुषांसाठी 12 नंबरपर्यंत आणि स्त्रियांसाठी 10 नंबरपर्यंत चप्पल मिळतात. या पारंपरिक चप्पलांची किंमत 650 रुपयांपासून सुरू होते. या स्टॉलची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व वस्तू स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तयार केल्या जातात. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आणि टिकाऊ वस्तू अगदी किफायती दरात मिळतात. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार या वस्तू 2 ते 3 वर्षे टिकतात मात्र त्यांचे आयुष्य वापरण्यावरही अवलंबून असते. सरासरी 4 ते 5 वर्ष या वस्तू आरामात टिकतात असा अनुभव ग्राहकांनीही दिला आहे.
advertisement
केवळ किरकोळ ग्राहकांसाठीच नव्हे तर स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. कारण या स्टॉलवर होलसेल आणि रिटेल दोन्ही दरात वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे व्यापारिक दृष्ट्या देखील हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे. दादरमधील सुविधाची गल्ली, रानडे रोड, सर्वोदय सुपर मार्केटच्या समोरील बाजूस असलेला हा स्टॉल परवडणारे दर, दर्जेदार माल आणि पारंपरिक शैली यांचा उत्तम संगम सादर करतो. त्यामुळे दादर परिसरात चामड्याच्या वस्तू खरेदीसाठी हे ठिकाण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.





