पुणे अपघात प्रकरण महाबळेश्वरपर्यंत पोहोचलं आहे. विशाल अग्रवालचं महाबळेश्वरमध्ये पंचतकारांकित हॉटेल आहे. ते हॉटेल सरकारी जागेत आहे. नगरपालिकेत या हॉटेलविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर कारवाई केली गेली नव्हती. एमपीजी क्लब हे विशाल अग्रवाल यांचं हॉटेल आहे. सरकारी जागेवर हे हॉटेल बांधलं आहे. सरकारी जागा असताना ठराविक बांधकामाला परवानगी असताना हॉटेल उभारलं आहे. याविरोधात नगरपालिकेत तक्रारी दाखल आहेत. हे हॉटेल विशाल अग्रवाल यांचं असल्याची माहिती महाबळेश्वरचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितली.
advertisement
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांनी विशाल अग्रवाल यांच्या हॉटेलविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ज्या जागेवर हॉटेल आहे तिथे पारसी जिमखान्याची मालकी होती. २०२० मध्ये ट्रस्टची जागा विशाल अग्रवाल यांच्या नावावर कशी झाली. ट्रस्टला क्लबसाठी परमिशन होती. पण मोठं रिसॉर्ट कसं तयार झालं? भाडेतत्वावर घेतलेली जमीन पुन्हा भाडेतत्वावर दिलीय. हे कसं? यावर तक्रार दिल्यानंतरही कशी तक्रार झाली नाही. 2020 पासून अग्रवाल कुटुंबियांना भाड्यानं दिलीय. त्याआधी पारसी जिमखाना ट्रस्ट होती. ट्रस्टची नावे कमी केली गेली अग्रवाल कुटुंबियांची नावं आली आहेत असंही अभय हवलदार म्हणाले.
दरम्यान, हॉटेलच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात तक्रारी आल्या आहेत. त्याच्या परवानग्या आणि जागेवर असलेली परिस्थिती पाहून योग्य ती कारवाई केली आहे. अजुनतरी यावर काही आदेश आलेले नाहीत. मात्र तक्रारीची खातरजमा करून कारवाई केली जाईल अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.