नेमकं काय घडलं?
भाजपचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी लगेच मिरवणूक सुरू केली. देगाव फाट्यापासून पोवई नाक्यापर्यंत कार्यकर्ते गुलालाची उधळण करत होते. या रॅलीमध्ये अमर संजय जाधव (वय 27, रा. कोडोली, ता. सातारा) यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची तब्बल 3 तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. अशाच प्रकारे आणखी 5 जणांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेल्याचे समोर आले आहे. एकूण 10 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले.
advertisement
विजयानंतर उदयनराजे यांची प्रतिक्रिया
या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदार संघातून मनापासून काम केलं, त्यामुळं हे शक्य होऊ शकलं. आकडेवारी पाहिली तर निश्चित हे संगेन शिवेंद्रराजे नसते तर ही निवडणूक अवघड झाली असती. भविष्य काळात जेवढे आमदार, नेते असतील या सगळ्यांना विचारात घेऊनच वाटचाल होईल. कधी कधी प्रश्न पडतो एवढी कामे केल्यावर आज जो कौल लोकांनी दिला ते बघून प्रश्न पडतो. येवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधात कौल दिला तो नेमका कशामुळे दिला. एवढंच सांगेन भविष्यकाळात या जिल्ह्याकरीता जे जे करावे लागेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही.
वाचा - ठरलं! या तारखेला होणार मोदींचा शपथविधी! शिंदेंनाही मिळणार स्थान, अजितदादांचं काय?
सातारा आणि जावळी याचं लीड कमी करण्याचं काम झालं. शिवेंद्रराजे आणि त्यांचे सहकारी पळाले म्हणून मी निवडून आलो याची जाणीव आहे. पुढील काळात आमदारकीची निवडणूक असेल त्यात जीव तोडून काम करणार आणि हेच आमदार पुन्हा दिसणार याची खात्री देतो, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.
