TRENDING:

Satara Politics : महापालिका निवडणुकीनंतर हालचालींना वेग, साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक!

Last Updated:

Satara ZP Election Politics : साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांची गुप्त बैठक पडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Satara ZP Election Politics : आज महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल समोर येईल. अशातच काल साताऱ्यात मोठ्या हालचाली पहायला मिळाल्या. सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून, राजकीय गणिते जुळवण्यासाठी विविध पातळ्यांवर हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Satara ZP Election Politics
Satara ZP Election Politics
advertisement

बैठकीसाठी कमालीची गुप्तता

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी काल रात्री एक विशेष बैठक पार पडली, ज्यामध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या बैठकीसाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती आणि कोणालाही आत प्रवेश दिला गेला नव्हता. महायुतीमध्ये सध्या जागावाटप आणि रणनीतीवरून चर्चा सुरू असतानाच पार पडलेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

advertisement

एक सदिच्छा भेट आणि चहापानाचा कार्यक्रम

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही केवळ एक सदिच्छा भेट आणि चहापानाचा कार्यक्रम असल्याचे सांगत विषय हातावेगळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासदार नितीन पाटील यांनी ही एक प्राथमिक स्तरावरील चर्चा असल्याचे मान्य केले. जरी त्यांनी भाजपला कुठेही डावलले नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी या बैठकीतून शिवसेना आणि राष्ट्रवादी भविष्यात एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, मंत्री मकरंद पाटील यांनी या सर्व प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन पाळणे पसंत केलं. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, आता जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर वर्चस्व राहिले आहे. भाजप असो किंवा शिवसेना यांना यामध्ये फारसे महत्त्वाचे स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता भाजप साताऱ्यात आपली ताकद दाखवण्याआधी स्थानिक नेत्यांनी आपली रणनिती तयार करण्यास सुरूवात केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Politics : महापालिका निवडणुकीनंतर हालचालींना वेग, साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल