TRENDING:

मधुरीमाराजेंची माघार, कोल्हापूरसह पक्षात नाचक्की, कार्यकर्त्यांसमोर सतेज पाटलांना अश्रू अनावर

Last Updated:

सोमवारी सायंकाळी शेकडो कार्यकर्ते सतेज पाटील यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने सतेज पाटील यांच्या होमग्राऊंडवर काँग्रेसची शोभा झाली. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस गायब झाली, असे टोमणे विरोधी पक्षांनी मारायला सुरुवात केली. काँग्रेसच्या नाचक्कीमुळे सतेज पाटील यांनी आक्रमक रुप धारण करून खासदार शाहू छत्रपती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुनवायला मागेपुढे पाहिले नाही. मधुरीमाराजे यांनी माघार घेतल्याने सतेज पाटील यांना निवडणुकीआधीच मोठा बसला. त्यामुळे खचलेल्या सतेज पाटील यांना बळ देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते जमा झाले. कार्यकर्त्याचे अपार प्रेम पाहून सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले.
सतेज पाटील यांना अश्रू अनावर
सतेज पाटील यांना अश्रू अनावर
advertisement

विधानसभा उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या अर्थात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्याने कोल्हापूर उत्तरमध्ये मविआचा उमेदवारच रिंगणात नसल्याने काँग्रेस गायब झाल्याची टीका विरोधक करीत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर टीका करताना 'गायब काँग्रेस' असा शब्दप्रयोग केला. सोमवारी दुपारपासून संपूर्ण राज्यात कोल्हापूर उत्तरबाबतीत जोरदार चर्चा झाली. सतेज पाटील यांचे आक्रमक रुप धारण केल्याची चित्रफीत राज्यात व्हायरल झाल्यानंतर होमग्राऊंडवर धक्का बसल्याची भावना व्यक्त होऊ लागलेली होती. त्यामुळे साहजिक सतेज पाटील यांना दु:ख झालेले होते.

advertisement

सोमवारी सायंकाळी शेकडो कार्यकर्ते सतेज पाटील यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले. यावेळी सतेज पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांचे अपार प्रेम पाहून सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. जे काही झाले ते तुमच्या समोर आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हा लोकांची साथ गरजेची आहे, असे म्हणत असताना सतेज पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

advertisement

झक मारायला मला तोंडघशी पाडलं का? सतेज पाटलांच्या संतापाचा कडेलोट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्याने सतेज पाटील तोंडघशी पडले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बोलून त्यांनी लाटकर यांच्याऐवजी छत्रपती घराण्यात उमेदवारी द्यायला लावली. मात्र त्यांनीच अंतिम क्षणी माघार घेतल्याने सतेज पाटील यांच्या संतापाचा पारा चढला. कशाला झक मारायला मला तोंडघशी पाडले? दम नव्हता तर उमेदवारी घ्यायची नव्हती ना... मी पण माझी ताकद दाखवली असती... अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. रागारागाने ते जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मधुरीमाराजेंची माघार, कोल्हापूरसह पक्षात नाचक्की, कार्यकर्त्यांसमोर सतेज पाटलांना अश्रू अनावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल