QR कोडद्वारे तक्रार कशी नोंदवाल?
या नव्या प्रणालीमुळे आता नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन कागदी अर्ज भरण्याची गरज राहणार नाही. आता फक्त एक QR कोड स्कॅन करून, नागरिक त्यांचे नाव, गाव, मोबाईल क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप नमूद करू शकतील. अर्ज किंवा निवेदन पीडीएफ (PDF) किंवा फोटो स्वरूपात अपलोड करण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.
advertisement
'ई-गव्हर्नन्स'चा आदर्श
तहसीलदार अजित शेलार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, "आमच्या कार्यालयाचा हा उपक्रम 'ई-गव्हर्नन्स' आणि डिजिटल युगातील प्रशासनाचे आधुनिक स्वरूप आहे. यामुळे नागरिकांना त्यांचे काम अधिक सोप्या पद्धतीने करता येणार आहे." या उपक्रमाचे कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले असून, यामुळे प्रशासकीय कामे अधिक कार्यक्षम आणि सोयीची होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : महसूलमंत्री बावनकुळेंची शेतकऱ्यांसाठी नवीन योजनेची घोषणा! शेतकऱ्यांना काय फायदे मिळणार? A TO Z माहिती
हे ही वाचा : 'गोकुळ' दूध संघाची मोठी घोषणा! मुराबरांबरोबर आता मिळणार 'पंढरीपुरी' म्हशी, तर 'या' योजनेचाही होणार विस्तार