आस्था सामाजिक संस्था वंचित गोरगरीब लोकांना दररोज दोन वेळचा जेवण पुरवण्याचं काम करत असते. त्याचबरोबर मंगळवार पेठेत आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी ह्यांनी गेल्या 4 वर्षापासून गॅरेजमध्ये गाईंसाठी अन्नछत्र उघडले आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर बँकेजवळ टू- व्हीलर गॅरेजमध्ये गोमातेसाठी ही सेवा सुरू केली. सिद्धेश्वर हौसिंग सोसायटीत राहणारे आनंद दररोज सकाळी घरातून बाहेर पडताना 40 ते 50 चपात्या सोबत घेतात.
advertisement
त्यांच्या पत्नी सुजाता या न चुकता चपात्या बनवतात अन् आनंद तालीकोटी यांच्या हातात देऊन गोमातेची सेवा बजावतात. गॅरेजमध्ये कितीही काम असले तरी आनंद हे गाईंना अन्नदान केल्याशिवाय राहत नाही. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी या तिन्ही वेळेस गायींना चपात्या खाण्यासाठी दिले जातात. तसेच नागरिकांकडून दिलेल्या भाजीपाला देखील या ठिकाणी गाईंना खाण्यासाठी दिला जातो. आस्था सामाजिक संस्थेकडून गरजू लोकांना जेवणासाठी अन्न दिला जातो. त्याच पद्धतीने मुक्या प्राण्यांना देखील अन्न मिळावं म्हणून आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांनी ही सेवा सुरू केली.