TRENDING:

आणखी एका 'वैष्णवी'चा बळी, पोटात बाळ असलेल्या ऋतुजाने संपवलं आयुष्य, सांगली हादरलं

Last Updated:

ऋतुजाने टोकाचं पाऊल उचल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ऋतुजाच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली : वैशाली हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असताना सांगलीत एका गर्भवती असणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.  एका सात महिन्याच्या गर्भवती विवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे.  सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे,या तिघांना अटक देखील केली आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ऋतुजा सुकुमार राजगे (वय 27) असं विवाहित तरुणीचं नाव आहे. 6 जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ऋतुजाने इतक्या टोकाचं पाऊल उचल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ऋतुजाच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहे.

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी होता ऋतुजावर दबाव

ऋतुजाने कधीच इतक्या टोकाचं पाऊल उचचलं नसतं. पण  सासरच्या मंडळींकडून वारंवार तिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव होता. सासरच्या लोकांकडून तिला मारहाण होत होती. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये ऋतुजाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सुरेश राजगे आणि अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तिघांनाही कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे.

advertisement

समजावून सांगितलं तरी ऐकलं नाही!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

'माझ्या मुलीने आत्महत्या केली. सांगलीमध्ये आम्ही तिचं हिंदू पद्धतीनं लग्न लावून दिलं होतं. पण लग्न झाल्यानंतर तिला त्रास सुरू झाला. घरातील लोक हे ख्रिश्चन पद्धतीचं आचारण करणारे होते. फादरच्या सांगण्यानुसार, ख्रिश्चन धर्म स्वीकार असा दबाव त्यांनी ऋतुजावर टाकला होता. हा सगळा प्रकार लग्न झाल्यानंतर समोर आला. त्यानंतर अनेक वेळा त्यांना समजावून सांगितलं. आम्ही हिंदू आहोत, असा धर्म स्विकारणार नाही. पण तरीही त्यांनी ऐकलं नाही. वारंवार त्यांनी ऋतुजावर दबाव टाकला आणि त्रास दिला. सुकुमार राजगे कुटुंबाकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती, या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्याचं पाऊल उचललं, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी  मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आणखी एका 'वैष्णवी'चा बळी, पोटात बाळ असलेल्या ऋतुजाने संपवलं आयुष्य, सांगली हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल