TRENDING:

सतेज पाटलांचा संताप, आज शाहू महाराजांनी पत्रक काढलं, 'अपमाना'वरून विरोधकांना ऐकवलं

Last Updated:

सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्याविरोधात अनुद्गार काढल्याची टीका विरोधकांनी केली. त्यांच्या टीकेला शाहू महाराज छत्रपती यांनी पत्रक काढून प्रत्युत्तर दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने संतापलेल्या सतेज पाटील यांचे आक्रमक रुप कोल्हापूरसह राज्याला बघायला मिळाले. दम नव्हता तर विधानसभेची उमेदवारी घ्यायची नव्हती, अशा शब्दात त्यांनी मधुरीमाराजेंच्या कार्यकर्त्यांना ऐकवले. बालेकिल्ल्यात काँग्रेसची शोभा झाल्यानंतर सतेज पाटील कमालीचे भावुक झाले. कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्याविरोधात अनुद्गार काढल्याची टीका विरोधकांनी केली. त्यांच्या टीकेला शाहू महाराज छत्रपती यांनी पत्रक काढून प्रत्युत्तर दिले आहे.
सतेज पाटील आणि शाहू छत्रपती
सतेज पाटील आणि शाहू छत्रपती
advertisement

काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नमल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदार संघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मार्ग घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही. एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना विरोध होऊ लागल्यानंतर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहाखातर पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती.

advertisement

लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्या जवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत आम्ही पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सम्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला.

काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर हे काँग्रेस विचारांचे असल्याने पर्यायाने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत.

advertisement

सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ल्याचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधील राजेश लारकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य चार जागा तसेच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रचार करणार आहोत.

माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकात्यांना उ‌द्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तरी काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीतून परत आलो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पोटासाठी किती दिवस रस्त्यावर नाचायचं? डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
सर्व पहा

विधानसभा निवडणु‌कीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या सात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व करीत आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा खासदार म्हणून मी लोकांची सेवा करीत राहणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सतेज पाटलांचा संताप, आज शाहू महाराजांनी पत्रक काढलं, 'अपमाना'वरून विरोधकांना ऐकवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल