साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या जलद कार्यपद्धतीमुळे प्रचलित आहेत. त्यांच्याकडे एखादा प्रश्न आला की तडीस लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. असाच प्रत्यय आज जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात पत्रकार परिषद सुरू असताना आला.
पत्रकार परिषद सुरु असताना अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील लँडलाईन फोनची रिंग वाजली आणि तो वाजत असलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला. समोरील व्यक्ती बऱ्याच दिवसापासून सातबारा दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत होता. याची तक्रार त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे फोन करून करण्याचे ठरवले. जिल्हाधिकाऱ्यांना फोन केलाही पण तो फउोउ उचलला पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी...
advertisement
जिल्हाधिकारी समजून संबंधित व्यक्तीने तक्रार केली. मात्र त्यावर पालकमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न समजून घेऊन प्रांतधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या फोनवरून सूचना दिल्या. यामुळे फोन करणाऱ्या व्यक्तीने शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत. पालकमंत्री देसाई यांनी चुकून उचललेल्या फोनमुळे एका व्यक्तीचे काम मात्र मार्गी लागले. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
