पुणे शहरात सध्या गणेशोत्सवामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील मानाच्या आणि इतर गणेश मंडळाकडून विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संदेश देणारे भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. शहरातील स्वातंत्र्यापूर्व काळातील महत्त्वाचं मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिपार गणेश मंडळाचं यंदा 133वं वर्ष आहे.
PMPML Bus: 17 महिलांचं नशीबच भारी! पीएमपीएमएलकडून मिळणार पैठणी अन् मोफत पास
advertisement
यंदा शनिपार मंडळाने जलमय द्वारकेचा देखावा देखावा उभा केला आहे. देखाव्यातील मोठ्या स्क्रीन आणि आगळ्यावेगळ्या प्रकारचं डेकोरेशन नागरिकासाठी आकर्षण ठरत आहे. भगवान श्रीकृष्णाची झोपलेल्या रुपातील भव्य मूर्ती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
महेंद्र कुमार यांनी साकारला देखावा
मुंबई येथील आर्ट डायरेक्टर महेंद्र कुमार यांनी हा जलमय द्वारकेचा देखावा साकारला आहे. मंडळाचे कार्यकर्ते आणि महेंद्र कुमार हे मागील तीन महिन्यापासून या भव्य देखाव्याची तयारी करत आहेत. पुणे शहरात प्रथमच भव्य स्वरूपाचा धार्मिक देखावा सादर करण्यात आल्यामुळे रात्रभर येथे नागरिकांची आणि भक्तांची दर्शनासाठी आणि देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.