स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यामध्ये उमेदवार निवड आणि प्रचार मोहिमेवर रणनीती ठरवण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देतील यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
स्थानिक पातळीवरील आघाडी बाबत निर्णय करा, पदाधिकाऱ्यांना सूचना
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक पार पडणार असल्याची देखील बैठकीत माहिती दिली. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडी बाबत निर्णय करा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका, शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
सातत्याने वादग्रस्त बोलणाऱ्या संग्राम जगताला यांचा शरद पवार यांच्याकडून निषेध करण्यात आला. तसेच
जातीय सलोखा ठेवा , अशा सक्त सूचना बैठकीत शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका , बोलताना प्रेमाची भाषा वापरा अशा सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. आपण करत असलेल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, असेही शरद पवार पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
रणनीती आखली
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा मानल्या जात आहे.विशेषतः महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यामधून होणाऱ्या निवडणुका केवळ स्थानिक मुद्द्यांपुरता मर्यादित राहत नाहीत.तर त्या आगामी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या राजकीय समीकरणांवरही परिणाम घडवू शकतात, त्यानुसारच राष्ट्रवादीने आपली रणनीती आखली आहे.