TRENDING:

मराठा आरक्षणावर शरद पवार यांची स्पष्ट भूमिका, प्रगतीच्या रस्त्याने जायचे असेल तर...

Last Updated:

Sharad Pawar on Maratha Reservation: रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील कडू यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी भाषणात मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीमधून मराठा आरक्षणाची मागणी करीत मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई महापालिका परिसर, आझाद मैदाना, मंत्रालय आदी भागातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईतल येतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला असताना सरकारकडून मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहे. अशा परिस्थितीत मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आरक्षण प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे पाटील-शरद पवार
मनोज जरांगे पाटील-शरद पवार
advertisement

ऐतिहासाहिक अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ नेते तथा रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील कडू यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी भाषणात मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट केली.

मराठा आरक्षणावर शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारच घेऊ शकते, असे स्पष्टपणे सांगत तामिळनाडूच्या आरक्षण पद्धतीकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. जर मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने कायदा करून निर्णय घ्यावा, असे शरद पवार म्हणाले.

advertisement

प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर...

प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे, हा आग्रह मांडला जातो. केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा. तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण राहू शकते तर वेळप्रसंगी घटनेमध्ये बदल करून सुद्धा मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्याचा निकाल संसदेमध्ये घेतला पाहिजे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी केली. याचाच अर्थ महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला मराठा आरक्षणविषयक कायदा करण्यासाठी सुचवले पाहिजे, असे शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

advertisement

मराठा आरक्षणाविषयी महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका काय?

इतर मागास प्रवर्गाचे अर्थात ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावे, अशी मराठा समाजाचीही भूमिका नाही किंबहुना नसावी. कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला देणे हे करता येणार नाही, असे स्पष्टपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून जे देण्यासारखे आहे, न्याय्य आहे, ते देण्याची भूमिका राज्य सरकारची आजही आहे. मात्र कुणाचेही आरक्षण कमी न करता, कुणाचेही नुकसान न करता आरक्षण देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, अशी सरकारची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठा आरक्षणावर शरद पवार यांची स्पष्ट भूमिका, प्रगतीच्या रस्त्याने जायचे असेल तर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल