TRENDING:

भाजपचा जिल्हाध्यक्ष अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसा मागतो, संतोष बांगर यांचे गंभीर आरोप

Last Updated:

Santosh Bangar: शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीच्या भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनीष खरात, प्रतिनिधी, हिंगोली: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत या ना त्या कारणावरून धुसफूस सुरू असताना हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. हिंगोली भाजपचे जिल्हाध्यक्ष हे अधिकाऱ्यांना धमक्या देऊन ब्लॅकमेल करतात, असे संतोष बांगर म्हणाले.
गजानन घुगे-संतोष बांगर
गजानन घुगे-संतोष बांगर
advertisement

हिंगोलीत महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गुरूवारी कळमनुरी उपविभागामध्ये अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे देखील उपस्थित होते. मात्र यावरून कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजप जिल्हाध्यक्ष हे अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमक्या देतात, कमरेखालची अर्वाच्च भाषा बोलतात. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात, पैशांची मागणी करतात असा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांच्यावर केला आहे. यामुळे महायुतीची प्रतिमा मलिन होत असल्याने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना याविषयी कळवणार असल्याचे आमदार संतोष बांगर म्हणाले आहेत.

advertisement

आमदार बांगर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार घुगें यांच्यावर केलेल्या या गंभीर आरोपांमुळे हिंगोलीत महायुतीमध्ये बिनसते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. संतोष बांगर यांच्या आरोपांवर माजी आमदार गजानन घुगे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपचा जिल्हाध्यक्ष अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसा मागतो, संतोष बांगर यांचे गंभीर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल