शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी पार पडणार आहे. सुप्रिम कोर्टात होणाऱ्या सुनावणीमध्ये लेखी स्वरूपात दाखल झालेले मुद्दे युक्तीवादाचा आधार असणार आहेत, अशी माहिती अॅड. असिम सरोदे यांनी दिली आहे. दरम्यान निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह गोठवलं ही प्रक्रिया चुकीची आहे असं देखील सरोदे म्हणालेत..
काय आहे पक्ष चिन्हाचा वाद?
- 21 जून 2022 रोजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं
- शिंदेंनी शिवसेनेचे 40 आणि काही अपक्ष आमदारांसोबत बंड केलं
- या बंडामुळे 29 जून रोजी महाविकास आघाडी सरकार पडले.
- याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतलेली
- 2023 मध्ये निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या स्वाधीन केलं.
- त्यानंतर 2024मध्ये विधानसभा अध्यक्षांनी देखील शिवसेनेच्या आमदारांना पात्र ठरवलं
- पण, सर्वोच्च न्यायालयात मात्र गेली तीन वर्ष शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल प्रलंबित आहे.
advertisement
ॲड असीम सरोदे म्हणाले, लवकर सुनावणी व्हावी अशी विनंती केली होती पण कोर्टाने सांगितले होते की वेळ नाही. उद्या अंतिम सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे.लेखी स्वरूपात दाखल झालेले मुद्दे युक्तीवादाचा आधार आहे. आमचे म्हणणे आहे की निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवले आहे. ती प्रक्रिया चुकीची आहे. आयोगाने पक्षचिन्हाचा निकाल देणं अपेक्षित होते परंतु ते एकनाथ शिंदेंना देऊन टाकले, हे चुकीचं आहे.
विरोधात निकाल दिला तरी चालेल पण लवकर द्यावी. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे आहे. निर्णय न झाल्याने जे लोक सत्तास्थानी आहेत परंतु ते बरोबर आहे असं नाही.