भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबद्दल वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो. अरविंद सावंत यांनी माफी मागायला हवी. एका महिलेचा सन्मान करण्याची पद्धत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना शिकवलीय. पण त्याच्या विरुद्ध काम अरविंद सावंत यांनी केल्याचं प्रसाद लाड म्हणाले.
advertisement
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. संजय शिरसाट म्हणाले की, शायना एनसी यांना अरविंद सावंत इम्पोर्टेड माल म्हणतात हीच का त्यांची महिलांबद्दलची भाषा? महिलांचा हाच का सन्मान? आदित्य ठाकरे यांचा नेता आहे. या लोकांना तारतम्य राहिले नाही. उद्धव साहेब सहन करतात तर आम्ही काय बोलावे?
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 01, 2024 1:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हाच का महिलांचा सन्मान? शायना एनसींबद्दल वक्तव्यानंतर अरविंद सावंतांना शिंदे गटासह भाजपने सुनावलं
