TRENDING:

'काही जण म्हणत होते शिवसेना ठाण्यापर्यंत पण...' एकनाथ शिदेंचा विरोधकांना सणसणीत टोला

Last Updated:

'आमचे सर्व लोकप्रतिनिधी मंत्री आमदार सर्वांचे आभार आहे. लाडक्या बहिणी लाडक्या भावांचा आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आहे'

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी मतमोजणी जवळपास आता पूर्ण होत आली आहे. महायुतीमध्ये शिवसेना दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेनं ५० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. काही जण म्हणत होते शिवसेना ठाण्यापूरती मर्यादित आहे. पण आता चांद्यापासून ते बांध्यापर्यंत पोहोचली आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
advertisement

नगरपरिषद निवडणुकीच्या यशावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली.

'मतदारांचे अभिनंदन करतो. लोकसभेत महायुतीला यश मिळालं, विधानसभेला यश मिळालं तसंच नगरपालिकेला यश मिळालं. असंच यश महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळेल असे संकेत मिळाले आहे. भाजपने सेंच्युरी मारली शिवसेना हाफ सेंच्युरी मारली आहे. काही जण म्हणत होते शिवसेना ठाण्यापूरती मर्यादित आहे पण आता चांद्यापासून बांध्यापर्यंत पोहचली आहे' असं म्हणत शिदेंनी विरोधकांना टोला लगावला.

advertisement

'आमचे सर्व लोकप्रतिनिधी मंत्री आमदार सर्वांचे आभार आहे. लाडक्या बहिणी लाडक्या भावांचा आभार मानतो सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील अभिनंदन करतो, भाजपला देखील चांगलं यश मिळालं आहे. शिवसेना हा नंबर २ चा पक्ष म्हणून महाराष्ट्रात आला. विधानसभेत लोकसभेत स्ट्राईक रेट होता तसाच या निवडणुकीत पण स्ट्राईक रेट चढा राहणार आहे' असा विश्वास एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवला.

advertisement

'जे लोक निवडणुकीत घरी बसले होते, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं. मतदारांनी जे घरी बसले होते त्यांना घरी बसवेल. ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. मी नेत्यांना, आमदार, मंत्र्यांना सांगितलं होतं. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहा. ज्या ज्या ठिकाणी नवीन कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते त्यांना तिकीट दिली सर्व मतदारांनी शिवसेनेला साथ दिली' असंही शिंदे म्हणाले.

advertisement

अंबरनाथमध्ये जिंकणार तर महायुती आहे. आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं, महायुतीलाा 75 टक्के पेक्षा जास्त यश मिळेल. ही कामाची पोच पावती आहे. लोक कामाला पसंती देत असतात. आमचा अजेंडा विकासाचा आहे. कोकणातही यश मिळालं. कामाचा एक विश्वास असतो. कोण मूलभूत सुविधा देऊ शकतो या विश्वासावर लोक येत असतात. लोकांना काम करणारा नेता हवा असतो घरी बसणारा नेता नको असतो. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे होता आणि राहणार, असंही शिंदे म्हणाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

महाविकास आघाडीच्या सगळ्यांची बेरीज पकडली ती एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आह.  शिवसेना कोणाची हे या निवडणुकीत मतदारांनी दाखवलं.  शिवसेना ही शिवसैनिकांची आहे. काही लोकांना ही मक्तेदारी वाटत होती काहीजण मालक आणि नोकर समजत होते. हा पक्ष कार्यकर्त्यांना सन्मान देणारा पक्ष आहे इथे कोणी मालक नाही नोकर नाही, जनतेच्या न्यायालयात जनतेने दाखवून दिल शिवसेना कोणाची आहे, असं म्हणत शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'काही जण म्हणत होते शिवसेना ठाण्यापर्यंत पण...' एकनाथ शिदेंचा विरोधकांना सणसणीत टोला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल