TRENDING:

मनसेला सोबत घेऊनही ठाकरेंना वाटतेय भीती? निवडणुकीआधीच पक्षाची वाढली चिंता, पडद्याआड काय घडतंय?

Last Updated:

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत राज ठाकरेंना सोबत घेऊन मुंबईतील सगळी राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत. आता निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी ठाकरे गटात अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महानगर पालिकांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीतले सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सर्वच पक्षाकडून स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन मोर्चेबांधणी केली जात आहेत. अशात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
News18
News18
advertisement

मुंबई काबीज करण्यासाठी सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू राज ठाकरेंना सोबत घेऊन मुंबईतील सगळी राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत. आता निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी ठाकरे गटात अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा आहे. मुंबईत मनसेला सोबत घेतल्याने साहजिकच उद्धव ठाकरे यांची ताकद वाढताना दिसत आहे. पण ठाकरे गटाला आता वेगळीच भीती सतावत असल्याची माहिती समोर येत आहे.

advertisement

पडद्याआड नक्की काय घडतंय?

खरं तर, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोची भूमिका घेतली आहे. तर शरद पवार हे ठाकरे गट आणि मनसेसोबत निवडणूक लढण्यास सकारात्मक आहे. तीन पक्ष एकत्र लढत असले तरी शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांच्या एका गटाला अल्पसंख्यांक मतं दुरावण्याची भीती सतावत आहे. मनसेला सोबत घेण्यास उद्धव ठाकरे ठाम असले तरी काँग्रेसला सोडण्याबाबत अजूनही संभ्रम आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
20 गुंठ्यात 4 लाख! मराठवाड्यातील शेतकऱ्याला सापडला यशाचा फॉर्म्युला, काय केलं?
सर्व पहा

याचं कारण म्हणजे मुंबईत काँग्रेसची चांगली ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना मोठ्या प्रमाणात मिळाली होती. अल्पसंख्यांक मतांच्या जोरावर ठाकरेंनी मुंबईतील सहा पैकी तीन जागा जिंकल्या होत्या. तर चौथी वायव्य मुंबईची जागा अवघ्या ४८ मतांनी हरली होती. अशा स्थितीत काँग्रेसचा हात सोडला तर साहजिक अल्पसंख्यांक मतांना ओहोटी लागण्याची शक्यता आहे. परिणामी अनेक ठिकाणी मतं विभागू शकतात. याचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांच्या एका गटाला अजूनही काँग्रेस सोबत असावी, असं वाटत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनसेला सोबत घेऊनही ठाकरेंना वाटतेय भीती? निवडणुकीआधीच पक्षाची वाढली चिंता, पडद्याआड काय घडतंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल