मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील काही महिला प्रवासी या महामार्गावरून खासगी वाहनाने प्रवास करत होत्या. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अचानक वाहनाला अडवत महिलांवर हल्ला चढवला. चोरट्यांकडे बंदूक, चाकू यांसारखी धारदार शस्त्रे होती. शस्त्रांचा धाक दाखवत महिलांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याजवळील दागिने, मौल्यवान वस्तू, तसेच रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत पलायन केले.
advertisement
तपासासाठी विशेष पथक नियुक्त
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलांकडून प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली असून तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात नाकेबंदीही केली आहे.
महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
अंधाऱ्या, निर्जन पट्ट्यात घडलेल्या या धाडसी लूटप्रकरणामुळे महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वाढत्या प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बीडचा बिहार झाला आहे का?
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याच्या ज्या सुरस कथा बाहेर येत आहेत, त्या ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का ? असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो आहे.बीडमध्ये खून, दरोडे, दादागिरी घटनांनी सध्या वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे या घटनांमुळे निघत आहेत. विशेषतः बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याच्या ज्या सुरस कथा बाहेर येत आहेत, त्या ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का ? असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो आहे. जेव्हा कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक होते, गुंड व माफियांचे समांतर प्रशासन सुरू होते, तेव्हा बिहारसदृष्य परिस्थिती झालीय, असे म्हटले जाते. अलीकडच्या काळात बिहारच्या स्थितीत बरीच सुधारणा झालीय. पण ही तुलना होतेच. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याने आता बिहार होण्याचा बहुमान मिळवलाय.
हे ही वाचा :
