मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही सैनिक मेट्रो स्टेशनजवळ तैनात असताना हा गोळीबार झाला. तपासात असे दिसून आले की हल्लेखोर अचानक मागे वळला आणि त्याने काहीही कळायच्या आत गोळीबार केला. यानंतर जवळील इतर सैनिकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोराला ताब्यात घेतलं.
वॉशिंग्टन डीसीचे पोलीस अधिकारी जेफ्री कॅरोल यांनी सांगितलं की, हा हल्ला एकाच बंदूकधारी व्यक्तीने केल्याचं दिसून येतं आहे. या घटनेत इतर कोणत्याही संशयितांचा सहभाग असल्याचा अद्याप कोणताही पुरावा हाती आलेला नाही. रहमानउल्लाह लकनवाल असं २९ वर्षीय संशियत हल्लेखोराचं नाव आहे. तो २०२१ मध्ये अमेरिकेत आला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
advertisement
या गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोरावर देखील गोळीबार करण्यात आला आहे. यात तो जखमी झाला आहे. त्याच्यावर नेमका कुणी हल्ला केला? पोलीस की अमेरिकन जवान? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. हल्लेखोर जखमी झाला असला तरी त्याच्या जीवाला धोका नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की गोळीबारानंतर लगेचच लोक लपण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. काही मिनिटांतच संपूर्ण परिसर पोलीस, अग्निशमन दल आणि हेलिकॉप्टरने वेढला गेला.
ट्रम्पने ५०० गार्ड्स तैनात केले
वॉशिंग्टनमध्ये मोठ्या संख्येने नॅशनल गार्डचे सैन्य आधीच तैनात आहे आणि गोळीबारानंतर, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताबडतोब राजधानीत ५०० अधिक सैन्य पाठवण्याचे आदेश दिले. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले की हे निर्देश स्वतः राष्ट्राध्यक्षांकडून आले आहेत. सध्या, संयुक्त टास्क फोर्सचा भाग म्हणून शहरात सुमारे २,२०० सैन्य तैनात आहे. यावर स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हल्लेखोराला याची किंमत मोजावी लागेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.
