सुप्रीम कोर्टात 67,700 पगाराची सुवर्णसंधी, अर्ज करण्याची शेवटची संधी; कसा कराल अर्ज?
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकूण 198 जागा भरल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 असून, ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. तर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 5 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
advertisement
नोकरी सोडली, सुरू केला स्वतःचा व्यवसाय, मराठी दाम्पत्य आज करताय लाखोंची उलाढाल
जळगाव आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सपोर्ट स्टाफ आणि लिपिक पदांसाठी अनुक्रमे 125 आणि 73 जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी. याशिवाय, उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. काही विशेष पदांसाठी संगणकाचे ज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, जेणेकरून अर्ज प्रक्रिया सुलभ होईल. अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून अर्ज शुल्क 1500 रुपये + GST आहे. उमेदवारांनी लिपिक किंवा सपोर्ट स्टाफ यापैकी केवळ एकाच पदासाठी अर्ज करावा.
भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त ₹550 पासून घागरा-चनिया चोली
उमेदवारांना अर्जाप्रमाणेच अर्ज शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करावे लागणार आहे. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डाच्या ऑप्शनने तुम्ही पेमेंट करू शकणार आहेत. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवणे महत्त्वाचे आहे. अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, कारण चुकीच्या माहितीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. उमेदवारांना प्रथम ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी आणि बँकिंग विषयक प्रश्न असतील. लेखी परीक्षेत यशस्वी उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील. शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल, ज्यामध्ये उमेदवारांचे संवाद कौशल्य आणि बँकिंग क्षेत्रातील रुची तपासली जाईल.