TRENDING:

ऐन दिवाळीत प्रवाशांना धक्का! सिंधुदुर्ग - मुबंई विमानसेवा उद्यापासून बंद, कारण काय?

Last Updated:

ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा बंद होणार आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होतेय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिंधुदुर्ग: दिवाळीच्या तोंडावरच कोकणातील प्रवाशांना फटका बसणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. याबाबत महत्त्वाचं कारण पुढे आलंय. चिपी-मुंबई विमानसेवा ही 3 वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे हवाई प्रवासाची तिकीट विक्री बंद होणार आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 9 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्गातील ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु झाली होती.
सिंधुर्गातील विमान सेवा 26 ऑक्टोबर पासून बंद. नेमकं कारण काय?
सिंधुर्गातील विमान सेवा 26 ऑक्टोबर पासून बंद. नेमकं कारण काय?
advertisement

ऐन दिवाळीत प्रवाशांना दे धक्का

चिपी विमानतळ ते मुंबई ही विमानसेवा 3 वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. मात्र, आता चिपी-मुंबई विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.

advertisement

नागरिकांकडून नाराजी

दरम्यान, चिपी-मुंबई या विमानसेवेला प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमान सेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता पुन्हा ही सेवा कधी सुरू होणार याबाबत प्रवाशांकडून विचारणा होत आहे.

advertisement

परतीचा पाऊस अन् तळकोकणात 15 गावांमध्ये भातशेतीचे मोठं नुकसान, शेतकरी म्हणाले...

3 वर्षांपूर्वी झालं होतं उद्घाटन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन, रेल्वेत विकले पेन, अंधत्वावर मात करत मिळवली नोकरी
सर्व पहा

20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सिंधुदुर्ग येथून ऑक्टोबर 2021 मध्ये चिपी-मुंबई विमानसेवा सुरू झाली होती. ज्योतिरादित्य सिंधिया, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचं उद्घाटन मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं होतं. सिंधुदुर्गवासीयांसाठी ही निश्चितच मोठी खूशखबर होती. पण आता हीच विमानसेवा बंद होणार असल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा विमानसेवा सुरू होण्याची वाट पर्यटक आणि सिंधुदुर्गवासीयांना पाहावी लागणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सिंधुदुर्ग/
ऐन दिवाळीत प्रवाशांना धक्का! सिंधुदुर्ग - मुबंई विमानसेवा उद्यापासून बंद, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल