कोकणात थंडी आणखी वाढणार, मुंबईत काय स्थिती? पाहा हवामानाचा अंदाज
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मुंबईत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात थंडीचा कडाका वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : थंडीमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र गारठला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान 10 अंशांवर पोहोचलं असून, उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे राज्यभरातील थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. कोकणातील आजच्या हवामान स्थितीबद्दल जाणून घेऊ.
मुंबईत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात थंडीचा कडाका वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गारव्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या उपनगरांमध्ये सुद्धा तीन दिवसात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
आज मुंबईचे किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असेल. दरम्यान हवेची आर्द्रतेची पातळी 40 टक्के राहील
कोकणात काही ठिकाणी थंडीसह ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. येत्या काही दिवसात कोकणात थंडीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात घट झालेली पाहायला मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2025 8:07 AM IST









