मराठवाड्यात थंडीचा जोर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण, पाहा हवामान अपडेट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यात थंडीचा जोर वाढला आहे. आजच्या हवामान स्थिती बदल जाणून घ्या.
छत्रपती संभाजीनगर : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये 9 जानेवारी 2025 रोजी सौम्य आणि स्थिर हवामान राहील. सकाळच्या सत्रात थोड्या काही प्रमाणात गारव्याचा अनुभव येईल तर दुपारच्या वेळी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत सकाळी थोडासा गारठा जाणवेल तर दिवसभर हवामान उबदार राहील. किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता नाही. मात्र संभाजीनगरमध्ये 11 आणि 12 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये दिवसभर ऊन आणि सायंकाळी गारवा राहील. किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः लातूरमध्ये सकाळी धुक्यामुळे वाहनचालकांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांनी सिंचन व्यवस्थापनावर भर द्यावा.
advertisement
नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. दिवसभर हवामान स्वच्छ आणि उबदार असेल. सकाळी काही भागांमध्ये धुके दिसेल त्यामुळे नागरिकांनी गार ठिकाणी उबदार कपडे वापरण्याची काळजी घ्यावी.
advertisement
धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांत ऊन आणि सायंकाळी थोडा गारठा जाणवेल. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28 अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी ही हवामान स्थिती अनुकूल आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 09, 2025 7:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात थंडीचा जोर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण, पाहा हवामान अपडेट









