advertisement

ऑनलाईन वीज बिल भरा अन् आकर्षक बक्षिसे मिळवा, महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना काय?

Last Updated:

महावितरणने ऑनलाईन बीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक ही अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र आहेत.

+
News18

News18

सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : महावितरणने ऑनलाईन बीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक' ही अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र आहेत. 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महावितरण प्रशासनाकडून देण्यात आली.
advertisement
अशी आहे ही योजना
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे आणि जून- 2025 या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रा ऑनलाईन काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रामध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन आणि स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बैंकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील, अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी.
advertisement
महावितरणकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीजग्राहकांसाठी लागू असेल. ज्यांनी 1 एप्रिल 2024 पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत एकदाही बीज देयकावा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. अशा ग्राहकांना लकी ड्रा द्वारेस्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ श्रम, पैशाची बचत करत डिजिटल पद्धतीने बिल भरण्यास पसंती देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने बिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सिंधुदुर्ग/
ऑनलाईन वीज बिल भरा अन् आकर्षक बक्षिसे मिळवा, महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना काय?
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement