हा तानाजी कडा जवळपास 1000 फूट खोल आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रात्री उशिरा शोधकार्य सुरू करणे शक्य झाले नाही. मात्र, आज सकाळपासून पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून कसून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस दल, बचाव पथके तसेच जंगल परिसराचा अनुभव असलेले काही स्वयंसेवक मिळून शोधकार्यात सहभागी झाले आहेत.
advertisement
पर्यटनस्थळ म्हणून सिंहगड किल्ल्यावर हजारो नागरिक फिरायला येतात. अशावेळी अशा घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही काळापूर्वी देखील सिंहगड कड्यांवरून घसरून पर्यटक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गौतम गायकवाडचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र, तो खोल दरीत कोसळल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी शोधमोहीम अधिक गतीने सुरू केली आहे. या घटनेमुळे सिंहगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेत. पुढील काही तासांत शोधकार्याला यश मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
