सोलापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख सराफांपासून हे धाडसत्र सुरू झालं. सराफांच्या पतपेढ्या, बांधकाम व्यवसायिक आणि त्यांच्याशी संबंधित इतरांशी असलेले धागेदोरे, पाळंमुळं शोधून काढण्यात आले. व्यावसायिकांचं घरं आणि कार्यलयं मिळून 16 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये किती आणि काय काय सापडलं याबाबत अद्याप सविस्तर माहिती देण्यात आली नाही.
या छाप्यादरम्यान ६ किलो सोनं, ८० किलो चांदीच्या स्टॉकमध्ये तफावत जाणवत आहे. २ कोटींची रोकड आणि 200 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. एका सराफाने कागदावर 2200 किलो चांदीची विक्री दाखवली मात्र प्रत्यक्षात 80 किलोच्या चांदीची विक्री झाली होती. 9 कोटींचे दागिने परस्पर विक्री केल्याचं या तपासातून समोर आलं.
advertisement
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये व्यावसायिकाने काही पुरावे नष्ट केल्याचं दिसत आहे. तर माळ्यावर भंगाराच्या वस्तूंमध्ये कोट्यवधि रुपयांचे पैसेही सापडले आहेत. पुणे, सोलापूर, मुंबईतील प्लॅटशी संबंधित कागदपत्रही सापडले आहेत. हा सगळा प्रकार पाहून आयकर विभागाचे अधिकारी देखील चक्रावले आहेत.
