डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक असलेल्या संशयित आरोपी मनीषा माने मुसळे याच कारणीभूत असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.. त्यांच्या विरोधात पोलिसांनी 720 पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले आहे. 18 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आणि सव्वासातच्या सुमारास डॉ.शिरीष यांनी मुलगा डॉ. अश्विन यांना आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल भेटून आणि फोनवरून माहिती दिली होती. 'मनिषा मुसळे हिच्यामुळे होणारा त्रास मी विसरू शकत नाही, सहनही करू शकत नाही.त्यामुळे मी माझे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
सीडीआरमधून माहिती मिळण्याची शक्यता
मात्र पोलिसांनी हे महत्त्वाचे सीडीआरच दोषारोपपत्रात जोडले नाही. आत्महत्येच्या आदल्या दिवशी डॉक्टरांनी कोणाला फोन केले होते? डॉक्टरांना कोणाचे फोन आले होते? ज्यांच्याशी बोलणे झाले त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे सीडीआरमधून मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सीडीआर न जोडल्याने अनेक गुपीत त्यामध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सीडीआर नसल्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह
मनिषा हिची रुग्णालयातील अरेरावी आणि पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ.शिरीष यांनी डिसेंबर 2024 पासून तिचे अधिकार कमी केले होते.त्यामुळे चिडलेल्या मनीषाने डॉ.शिरीष यांना भेटून आणि फोनवरून सतत बदनामी व प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली. ई-मेल पाठवून मुलांना मारून स्वत: रुग्णालयासमोर जाळून घेऊन आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती,असे पोलिसांनी त्यांच्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, हे पाहण महत्त्वाचे आहे. सीडीआर नसल्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.