TRENDING:

Solapur Accident: लग्न सोहळ्याहून घरी परतताना नियतीनं घात केला, पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा तडफडून मृत्यू

Last Updated:

सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर तांदुळवाडी येथे एसटी बसच्या अपघातात शाहेनाज महेबुब शेख यांचा मृत्यू, पती महेबुब नबिलाल शेख गंभीर जखमी, पोलिस तपास सुरू.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर, प्रतिनिधी प्रीतम पंडित: लग्न समारंभ आटपून घरी निघालेल्या कुटुंबावर नियतीनं आघात केला. हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं. काळ आणि वेळ दोन्ही एकत्र आले आणि एका क्षणात सगळं संपलं. लग्नाहून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला.
News18
News18
advertisement

तांदुळवाडी इथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभातून घरी परत निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे. अपघात इतका भीषण होता की, चंदन काटा, हैद्राबाद रोडवर पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. मृत महिलेचे नाव शाहेनाज महेबुब शेख असे असून, त्यांचे पती महेबुब नबिलाल शेख हे गंभीर जखमी अवस्थेत आहेत.

advertisement

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीनं त्यांनी जखमी पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने पती महेबुब आणि शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाच्या क्षणातून परतत असताना नियतीने त्यांच्यावर घात केला. महेबुब आणि शाहेनाज यांचे आयुष्य काही क्षणांपूर्वी आनंद आणि उत्साहाने भरलेले होतं, पण एसटीच्या धडकेने शाहेनाज यांना त्यांच्या पतीपासून कायमचे हिरावून नेलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून जखमी महेबुब शेख यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. लग्नाच्या आनंदातून कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Accident: लग्न सोहळ्याहून घरी परतताना नियतीनं घात केला, पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा तडफडून मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल