सोलापूर पुणे मुंबई विमान प्रवासासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायबेलिटी गॅप फंडिंग) निधी उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंजरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठीकीत हा निर्णय घेण्यात आला.
advertisement
केंद्र शासनाने सामान्य नागरीकांना विमानसेवा परवडेल यासाठी उडान (रिजनल कनेक्विव्हिटि स्किम)सूरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठी ही योजना लागू होणार आहे. त्यामुळे ही योजना लागू होईपर्यंत 3 हजार 240 रूपये दराने प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायबेलिटी गॅप फंडिंग) म्हणून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे.
गणेशोत्सवाच्या आधी ही सेवा सुरू व्हायला कोणताही अडचण येणार नाही.गणपतीच्या आधी ही विमानसेवा सूरू होईल, अशी माहिती जयकुमार गोरे यांनी दिली आहे.तसेच विमानसेवेच्या फेऱ्या अनेक होणे आवश्यक आहे. एकदा विमानसेवा सुरू केली की किती फेऱ्या होतील, हे कळणार आहे.तसेच सेवा सूरू झाली की आवश्यकतेनुसार फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय
महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामिनदाराबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळाना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे लघुउद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया आधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे.
