सोलापूर - राज्य सरकारच्या वतीने विविध दुर्बल घटकांना तसेच व्यवसायांना चालना देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये मेंढीपालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील पशुपालकांना बळ देण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाला शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा, त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठीही राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे. याच योजनेबाबत आपण जाणून घेऊयात.
advertisement
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना शेळी, मेंढीपालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले की, योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शेळी, मेंढीपालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. आतापर्यंत या योजनेसाठी जिल्ह्यातून 12483 जणांनी अर्ज केला आहे. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने - मेंढीपालनासाठी पायाभूत सोयीसुविधांसह अनुदान दिले जाते.
नवरात्रौत्सवात देवीला द्या मालवणी शेवयांच्या खीरचा नैवेद्य, अशी आहे सोपी रेसिपी, VIDEO
यामध्ये मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी जागाखरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाते. अर्धबंदिस्त व बंदिस्त मेंढीपालन व्यवसायाला चालना देणे, मेंढीपालनाच्या पारंपरिक व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेचे अर्ज www.mahamesh.org 'या संकेतस्थळावर उपलब्ध असून, जास्तीत जास्त पशुपालक राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेसाठी ही कागदपत्रे आवश्यक -
आधार कार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, अर्जदार दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र, अर्जदाराच्या जमिनीचा दाखला, सातबारा, आठ अ उतारा, शेळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, मोबाइल नंबर, पासपोर्ट फोटो.