उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते कार्तिकी यात्रा 2025 च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खा. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
advertisement
दर्शन मंडप काम गतीने होणे गरजेचे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप काम गतीने होणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केलेले असून वारकऱ्यांना लवकर दर्शन मिळत आहे. कारण वारकरी हाच व्हीआयपी असल्याचे त्यांनी सांगून वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.
