TRENDING:

Solapur : सोलापूरात 'टीम हैदराबाद'कडून काँग्रेसचा गेम, 50 जणांच्या जोरावर भेदला प्रणिती शिंदेंचा गड, पाहा कसं?

Last Updated:

AIMIM Peformance in Solapur Election : एमआयएम पक्षाचे सोलापुरात पाणीपत होणार अशी चर्चा असताना आठ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्षवाटत असतानाच पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचा करिष्मा चालला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Solapur SMC Municipal Corporation Election Results (प्रितम पंडित, प्रतिनिधी) : सोलापूर महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या प्रचंड लाटेतही एमआयएमने तब्बल आठ नगरसेवक निवडून आणत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले. भाजपची लाट असूनसुद्धा मतांचे ध्रुवीकरण एमआयएमच्या बाजूने वळवण्यात पक्ष यशस्वी झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांची ताकद लक्षणीयरीत्या घटल्याने एमआयएमचा उदय अधिक ठळक झाला आहे.
AIMIM Peformance In Solapur Municipal Corporation Election Results
AIMIM Peformance In Solapur Municipal Corporation Election Results
advertisement

सोलापुरात काँग्रेसचं पाणीपत

भाजपची लाट असूनही मतांचे ध्रुवीकरण एमआयएमच्या बाजूने वळवण्यात पक्ष यशस्वी ठरला. 2024 चे सोलापूर शहर मध्यचे एमआयएम पक्षाचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी पक्षातील अंतर्गत वादातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा राजीनामा दिला. यातून एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक पठाण यांच्याकडे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची धुरा देण्यात आली. फारुख शाब्दी आणि शौकत पठाण यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष झाला. यातूनच एमआयएम पक्षाचे सोलापुरात पाणीपत होणार अशी चर्चा असताना आठ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्षवाटत असतानाच पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचा करिष्मा चालला.

advertisement

हैदराबादची टीम सोलापुरात

निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 आणि 20 हे एमआयएमचे बालेकिल्ले ठरले. मुस्लिम बहुल असलेल्या या भागांमध्ये पक्षाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत निर्णायक वर्चस्व राखले. विरोधी पक्षांकडून जोरदार प्रयत्न झाले, मात्र एमआयएमची संघटनात्मक पकड, स्थानिक नेतृत्व आणि मतदारांशी असलेला थेट संवाद यामुळे येथे पक्षाला भक्कम यश मिळाले. गेल्या टर्ममध्ये एमआयएमचे 9 नगरसेवक निवडून आले होते, तर यंदाच्या टर्ममध्ये 8 नगरसेवक निवडून आले आहेत. हैदराबादची टीम सोलापुरात ठाण मांडून बसली होती. यातील 50 जणांनी मिळून सोलापुरात काँग्रेसचा गड उद्धवस्त केला पण भाजपला याचा फायदा झाला.

advertisement

एमआयएममध्ये अंतर्गत मतभेद

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Social Media वर व्हायरल, मसाला पायनापल रेसिपी, घरीच बनवा सोप्या पद्धतीनं Video ‎
सर्व पहा

दरम्यान, आगामी काळात महापालिकेतील चर्चांमध्ये, धोरणात्मक निर्णयांमध्ये आणि अल्पसंख्याक प्रश्नांवर एमआयएमचा आवाज अधिक ठळकपणे ऐकू येण्याची शक्यता आहे. संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्नांवर लक्ष आणि मतदारांशी थेट संवाद महत्त्वाचा ठरतो. एमआयएमने अंतर्गत मतभेद असूनही प्रतिष्ठा राखत आपले अस्तित्व मजबूत केले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur : सोलापूरात 'टीम हैदराबाद'कडून काँग्रेसचा गेम, 50 जणांच्या जोरावर भेदला प्रणिती शिंदेंचा गड, पाहा कसं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल