पोलिस उपअधिक्षक घटनास्थळी पोहचल्या
झालं असं की, माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्याचं काम सुरू होतं. रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन यावेळी पोलिस उपअधिक्षक अंजना आणि गावकऱ्यांममध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी एका कार्यकर्त्याने थेट अजित पवार यांना फोन लावला. शाब्दिक जुलगबंदी सुरू असताना कार्यकर्त्याने अजित पवार यांना फोनवरून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिस उपअधिक्षकांसोबत अजितदादांनी बोलणं केलं. पण...
advertisement
मै डीसीएम अजित पवार बोल रहा हूँ...
अंजली कृष्णा यांना अजित पवार यांचा आवाज ओळखूच आला नाही. मै डीसीएम अजित पवार बोल रहा हूँ... ये कारवाई बंद करो, असं अजित पवार बोलत होते. मात्र, अंजली कृष्णा यांना अजित पवारांच्या आवाजावर विश्वास बसला नाही. त्यावेळी अंजली यांनी व्हिडीओ कॉल करण्याची विनंती केली. यावेळी त्या शेतकऱ्यांच्या बांधावरच बसल्या.
अजित पवार यांचा व्हिडीओ कॉल
अजित पवार यांनी व्हिडीओ कॉल करून कारवाई न करण्याच्या सुचना केल्या. अंजली कृष्णा आणि पवारांच्या संवादाच्या क्लिप व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार अथवा गुन्हांची नोंद झालेली नाही. फोन थेट स्पीकरवर टाकून बोलायला लावल्याने अजितदादांचा अधिकाऱ्याला दम देताना देखील दिसले. त्यामुळे आता सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.