मराठा समाजाला खरंखुरं आरक्षण दिलं पाहिजे : पंकजा मुंडे
भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की मराठा समाजाची ओबीसीमधून आरक्षणाची मागणी नव्हती. मराठा समाजातील जे वंचित घटक राहिलेले आहेत. त्यांना आरक्षण मिळावे हे मुंडे साहेबांपासून आजच्या नेत्यांपर्यंत सर्वांची इच्छा आहे. ओबीसीमधून आरक्षण देणे संविधानाच्या दृष्टीने शक्य नाही. मराठा समाजाला खरेखुरे आरक्षण दिले पाहिजे जे कोर्टात टिकेल, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. मराठा समाजातील युवकाने आत्महत्या केल्याच्या घटनेवरही पंकजा यांनी आपलं मत मांडलं. मराठा समाजातील युवकांना पंकजा मुंडे यांनी हात जोडून विनंती केली आहे. युवकांनो स्वतःचा जीव देऊ नका. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे लढा, जीव देण्यासारखे करू नये.
advertisement
मराठा समाजातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही. ठराविक वर्गाला ते देऊ शकतात. ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देणे संविधानिक दृष्ट्या शक्य होणार नाही असे मला वाटते. आरक्षणाच्या मर्यादेत वाढ केली तर ते देणे शक्य होईल. इतर राज्यातही तीच परिस्थिती आहे. आरक्षणाचा प्रश्न हा न्यायालयीन पातळीवर हाताळणे योग्य आहे. मराठा समाजाच्या मोर्चामध्ये मी एकमेव नेता आहे, परळी येथील सभेत भाषण केले होते.
वाचा - मराठवाड्यात मराठ्यांना आरक्षण मिळणार? 1 लाख प्राध्यापक लागले कामाला
शिव शक्ती परिक्रमा यात्रा
शिवशक्ती परिक्रमा यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद आहे. सोलापुरात आल्यावर आमदार विजयकुमार मालकांना भेटल्याशिवाय जात नाही. परिक्रमा यात्रेत नागरिकांकडून विविध मागण्यांचे निवेदन दिले जात आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रश्न आहेत. सध्या राज्यावर दुष्काळाची परिस्थिती असल्याचेही पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले.
