भाजपमध्ये दोन गट, कार्यकर्ते संभ्रमात
माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले की,"सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजप कार्यकर्त्यांसाठी लढवली जाणार आहे. या निवडणुकीसाठी पाच ते सहा बैठका घेतल्या असून सोलापूर जिल्ह्याच्या तीनही भाजप आमदारांना आमंत्रण दिलं होते, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
advertisement
तर आनंद झाला असता...
सुभाष देशमुख यांनी म्हटले की. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी निवडणुका लढण्याचे सांगितले. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कोर कमिटीमध्ये युतीचा निर्णय घेतले असेल तप त्या कोअर कमिटीत मी आहे का नाही माहिती नाही. आम्हाला माहिती देऊन जर कोअर कमिटीने निर्णय घेतला असता तर आनंद झाला असता असेही त्यांनी म्हटले.
काँग्रेससोबत युती मान्य नाही...
भाजप पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय माझ्यावर असणार असल्याचे देशमुखांनी स्पष्ट केले. निवडणुकी संदर्भात कोअर कमिटीतून मुख्यमंत्र्यांना फोन केला असेल तर ते काय बोलले मला माहिती नाही. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा स्थानिक पातळीवरील नेत्यांचा मला निरोप आला नसल्याचे त्यांनी म्हटले. माध्यमांच्या मार्फत काँग्रेससोबत युती झाल्याचे कळले. पण, भाजप काँग्रेस युती आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
आमदार कलशेट्टी हे भाजप जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांना आघाडीबाबतचा अधिकार आहे. पक्षाने जिल्हाध्यक्षांना अधिकार दिले असतील तर त्याची माहिती नाही असे म्हणत सुभाष देशमुख यांनी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना चिमटा काढला.