लोकमान्य टिळक 1985 साली सोलापुरातील विंचूर वाड्यात आले होते. सोलापुरातील प्रसिद्ध उद्योगपती आप्पासाहेब वारद आणि लोकमान्य टिळक यांच्यात घनिष्ठ मैत्री होते. जुन्या फौजदारी पोलीस ठाण्याजवळ श्रद्धांनंद समाजाचे पसारे यांनी लोकमान्य टिळकांना आपल्या घरी पान सुपारीचे आमंत्रण दिले होते. लोकमान्य टिळक आणि अप्पा वारद शुक्रवार पेठेत आजोबा गणपती व गणेश उत्सव समारंभात पान सुपारीला गेले होते. या कार्यक्रमात सर्व नागरिक एकत्रित आलेले पाहून लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सुचली. त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली.
advertisement
Solapur News: सोलापूर पोलिसांचे नवे आदेश, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादला ‘ती’ चूक महागात पडणार
सोलापुरातील आजोबा गणपतीची मूर्ती 1985 साली रद्दी कागद, कामठ्या, डिंक, खळ, कापड अशा वेगवेगळ्या पर्यावरण पूरक साधनांपासून बनवण्यात आली होती. सध्याच्या काळात सर्वत्र पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात येते. परंतु 140 वर्षांपूर्वी सोलापुरातील आजोबा गणपती ट्रस्टने पर्यावरण पूरक सुंदर व सुबक गणेशमूर्ती तयार केली होती.
दरम्यान, सोलापुरात आजोबा गणपतीची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही कायम आहे. सध्याच्या काळात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो, असे निंबाळे सांगतात.