सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप या खेडेगावातील एक तरुण मुलगा आज महाराष्ट्रातील नामवंत गायकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. मोहम्मद आयाज (रा. मंद्रूप) असे या गायकाचे नाव आहे. मंद्रूप येथील बस स्टँडजवळ असलेल्या एका चहाच्या हॉटेलमध्ये ते लहानपणी काम करायचे आणि त्या हॉटेलमध्ये असलेल्या रेडिओवर लागणारे गाणे ऐकायचे आणि मग गाणी ऐकता ऐकताच ते गुणगुणायचे.
advertisement
सकाळी जेव्हा शेळी, गुरे राखण्यासाठी शेतात जायचे, तेव्हा त्यांच्या समोर असलेल्या लोकांसमोर मोहम्मद आयाज गाणी म्हणायचे. तर उन्हाळ्यात बस स्टॅण्डवर गाणी म्हणत म्हणत लिंबू सरबत विक्री करायचे. तर शाळेत जाताना अंगावर शाळेचा गणवेश नसायचा. त्यामुळे शाळेत दररोज शिक्षक रागवायचे. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना गणवेशही मिळत नव्हता.
एकदा त्यांच्या शाळेत देशभक्तीपर गीत स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी मोहम्मद आयाज यांनी भाग घेत "ए मेरे वतन के लोगों, ज़रा आँख में भर लो पानी", हे गाणे गायले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एपीआय उपस्थित होते. त्यांनी आयाज यांच्या गायनाचे कौतुक केले आणि त्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश न पाहून एपीआय यांनी शाळेचे गणवेश देण्याचे जाहीर केले. या गायनामुळे गणवेश मिळाल्यावर ते आनंदी झाले आणि यानंतर आपण गायन कलेची साधना करावी, असे निश्चित केले.
आज मोहम्मद आयाज आपल्या आगळ्यावेगळ्या गायनशैलीने रसिकांच्या मनावर गारूड केले आहे. कला हेच उपजीविकेचे साधन मानून त्यांनी एक आदर्शदेखील निर्माण केला आहे. मोहम्मद आयाज यांनी एकाहून एक श्रेष्ठ गायक-गायिकांबरोबर मैफली सादर केल्या आहे. अनेक देशांचे दौरेही त्यांनी केले आहेत. आपल्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करत मोहम्मद आयाज यांनी यशाची एकापेक्षा एक मोठी शिखरे काबीज केली आहेत.
याठिकाणी मिळतात घरासारखे पौष्टिक पोहे, दरही कमी अन् चवही भारी! हे आहे लोकेशन
सोलापूरात होणाऱ्या गणेशोत्सव, सांस्कृतिक उत्सवमध्ये ते गाणी म्हणायचे. मोहम्मद आयाज यांनी वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रांमध्ये देखील गायन केले. पुणे, मुंबईसह त्यांच्या राज्यभरात शो सुरू झाले आणि मानधनही मिळू लागले. तेवढ्यावरच मोहम्मद आयाज हे समाधानी नव्हते. मोहम्मद रफी यांच्या आवाजाची आठवण व्हावी, असे त्यांचे गायन होते. त्यामुळे मोहम्मद आयाज यांना व्हॉईस ऑफ रफी' म्हणून गौरव होऊ लागला.
आवाज हे भांडवल असल्याचे लक्षात आल्यावर मोहम्मद आयाज यांनी आवाज जपण्यासाठी त्यांनी तुरट, आंबट पदार्थांचे सेवन कमी केले. एका टीव्ही शोची स्पर्धाही मोहम्मद आयाज यांनी जिंकली आणि 'महाराष्ट्राचा महागायक' ही पदवी त्यांना मिळाली.
आतापर्यंत अबुधाबी, श्रीलंका, सिंगापूर, दुबई, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया या देशांचा दौरा करून तिथे व्यक्तिगत आणि समूहांमध्ये गायनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहे.
तसेच देशातील एक महान गायिका आशा भोसले, उषा मंगेशकरांप्रमाणेच त्यांनी रेणुका शहाणे, रवीना टंडन, सपना अवस्थी, शब्बीरकुमार, अवधूत गुप्ते, आनंद शिंदे, वर्षा उसगावकर, दीपाली सय्यद, वैशाली सामंत, राजू श्रीवास्तव, जॉनीलिव्हर, शक्तीकपूर, विनोद राठोड, असरानी यांच्यासमवेत विविध कार्यक्रम देशविदेशात केले आहेत. आजही मोहम्मद आयाज यांनी आपल्या गायनाने मंत्रमुक्त करून रसिकांचे मन जिंकत आपली घौडदौड कायम ठेवली आहे.





