याठिकाणी मिळतात घरासारखे पौष्टिक पोहे, दरही कमी अन् चवही भारी! हे आहे लोकेशन
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
याठिकाणी पोह्यांचे अनेक प्रकार मिळतात. यात क्लासिक पोहा, तर्री पोहा, वांगी पोहा आणि कॉर्न पोहा यांचा समावेश आहे. या सगळ्या पोह्यांची किंमत फक्त 25 रुपये आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : सकाळी नाश्त्यासाठी पोहे ही सर्वांची पहिली पसंती असते. त्यात जर ते पोहे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर आणखीनच उत्तम. असेच एक ठिकाण आहे, ज्याठिकाणी वेगवेगळे प्रकारचे पोहे मिळतात. हे दुकान नेमकं कुठे आहे, या दुकानाचे वैशिष्ट नेमकं काय आहे, हे जाणून घेऊयात.
काय आहे वैशिष्टय?
रोजच्या सकाळच्या गडबडीत अनेकांना नाश्ता न करता ऑफिसला जावं लागतं. मग अशा वेळेस बाहेर खाताना चांगलं अन्न न खाल्ल्यामुळे त्रास होतो. याच विचारांनी सुशांत दिवेकर या मराठी माणसाने दोन ते अडीच वर्षांपूर्वी घरी ज्या पद्धतीने पोहे बनवले जातात त्याच पद्धतीने आरोग्याला पौष्टिक पोहे सर्वांना खायला मिळावे म्हणून पोवाह या नावाने दुकान सुरू केले. ठाणे स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटांवर हे दुकान आहे.
advertisement
इतक्या प्रकारचे मिळतात पोहे -
सुशांत यांचं कॉमर्समधून शिक्षण झालं असून जॉबमध्ये त्यांना फारसा रस नव्हता. आपणही काहीतरी व्यवसाय करायला हवा ही इच्छा त्यांची पूर्वीपासूनच होती. त्यात अडीच वर्षांपूर्वी त्यांनी व त्याच्या मोठ्या भावाने मिळून नाश्त्यासाठीच्या या दुकानाला सुरुवात केली. पोवाह असे या दुकानाचे नाव आहे. याठिकाणी पोह्यांचे अनेक प्रकार मिळतात. यात क्लासिक पोहा, तर्री पोहा, वांगी पोहा आणि कॉर्न पोहा यांचा समावेश आहे. या सगळ्या पोह्यांची किंमत फक्त 25 रुपये आहे.
advertisement
पोह्यांसोबतच इथे उपमा, मिसळपाव, वडापाव हे पदार्थ सुद्धा मिळतात. सुशांत हे स्वतः सकाळी पाच वाजता पोह्यांची तयारी सुरू करतात. दिवसाला त्यांच्या पोह्यांच्या 150 ते 200 प्लेट विकल्या जातात. त्यांच्या दुकानाच्या समोर सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत कायमच खवय्यांची गर्दी पाहायला मिळते.
दोन मैत्रिणींनी केला अनेक अडचणींचा सामना, पण न खचता आज याठिकाणी उभं केलं अनोखं स्वयंपाकघर
'सकाळी नाश्ता बाहेर करायचा असेल तर सध्या फ्रॅंकी वडापाव हेच पदार्थ उपलब्ध असतात. यामुळे अनेकांना त्याचा त्रास होतो. हे होऊ नये म्हणूनच लोकांना पौष्टिक अन्न मिळावं, या उद्देशाने मी पोह्यांचं दुकान सुरू केलं. आता ठाण्यातील कॉलेजच्या मुलांचे आणि ऑफिसला जाणाऱ्यांचे हे पोहे आवडीचे झाले आहेत, असे पोवाह या दुकानाचे मालक असणाऱ्या सुशांत दिवेकर यांनी सांगितले.
advertisement
तर खवय्ये मित्रांनो तुम्हालाही जो प्रसिद्ध आणि खमंग पोह्यांची चव चाखायची असेल तर आवर्जून ठाण्यातील या सुशांत यांच्या पोवाह या दुकानाला भेट देऊ शकता आणि आरोग्यदायी व पौष्टिक पोहे खाऊ शकतात.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
June 27, 2024 6:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
याठिकाणी मिळतात घरासारखे पौष्टिक पोहे, दरही कमी अन् चवही भारी! हे आहे लोकेशन